प्रतिनिधी,पलूस
Sangli News : हरिणय संवर्गातील वन्य प्राण्याच्या दात नसलेल्या तोंडाच्या हाडासहीत दोन शिंगे विनापरवाना तस्करी करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगल्याप्रकरणी पलूस येथील एकास पोलिसांनी ताब्यात घेतले.
रोहीत बाबुराव कांबळे (वय-३३, रा. शिरशिंग-कोयना वसाहत पलूस) असे संशयित आरोपीचे नाव आहे. रोहीत हा शनिवार (दि. २६) ऑगस्ट रोजी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास कोयना वसाहती जवळ असणाऱ्या शाळेच्या गेटसमोर उभा होता. त्याच्या हातात असणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या पोत्यात हरणाच्या दात नसलेल्या तोंडासह शिंगे असल्याची माहिती गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून पन्नास हजार रूपये किमतीचे शिंगे मिळून आली. यामध्ये एका हरीण संवर्गातील वन्य प्राण्याच्या दात नसलेल्या तोंडाच्या चौदा व लांब सहा इंच रूई फुटलेल्या अवस्थेतील हाडासहीत काळपट पांढरे रंगाचे प्रत्येकी ३१ हज लांबीचे वरील बाजूस टोकदार व निमूळत असलेली दोन शिंगे व एक पांढरे पोते पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रविण मलमे यांनी पलूस पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजश्री दुधाळे करीत आहेत.








