क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेंगळूर येथे विविध गटात झालेल्या स्क्वॅश स्पर्धेत 11 वर्षाखालील गटात दीपशिखा थोरातने सारा शिखटकरचा 3-0 असा पराभव करून तिसऱया क्रमांकाचे बक्षीस पटकाविले. या गटात दिव्या पारस रामपुरीयाने विजेतेपद तर अनन्या गणेशने उपविजेतेपद पटकाविले. बेंगळूर येथे झालेल्या खुल्या स्क्वॅश स्पर्धेत 11 वर्षाखालील गटात थोरातला उपांत्य सामन्यात अग्रमानांकित दिव्या रामपुरीयाकडून 11-7, 9-11, 11-8, 11-9 असा पराभव पत्करावा लागला. तिसऱया क्रमांकासाठी झालेल्या लढतीत दीपशिखाने सारा शिखटकरचा 11-3, 11-0, 11-2 असा पराभव करून तिसरा क्रमांक पटकाविला. तिला मान्यवरांच्या हस्ते चषक, प्रमाणपत्र व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. दीपशिखा ही बेळगावचे माजी जिल्हा पोलीस प्रमुख प्रताप थोरात यांची कन्या होय.