मंत्री सुदिन ढवळीकर यांचे उद्गार
वार्ताहर /मडकई
संस्कृती व संस्कारातून मोठा झालेला माणूस काळाचे अभेद्य कवच फोडून पुढे जात असतो. अशा व्यक्ती खऱया ज्ञानी असतात व मन, मेंदू व मनगट अशी तिन्ही इंद्रीये तो काबूत ठेऊ शकतात. अशाच व्यक्तीच्या कार्यांतून समाजात क्रांती घडते. त्यासाठी प्रत्येक आई वडिलांनी मुलांना संस्कृती व संस्काराचे अमृत पाजावे. दीपोत्सवातून व्यक्तीगत व समाज जीवनात प्रकाशाची सोनेरी किरणे पसरेल, असे प्रतिपादन वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले.
बांदोडा येथील स्व. भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर माधवराव ढवळीकर ट्रस्ट व बांदोडा पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत केलेल्या ‘दीपोत्सव 2022’ या संस्कृतिक कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बांदोडाचे सरपंच सुखानंद गावडे, कवळे जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, दै. तरुण भारतचे निवासी संपादक सागर जावडेकर, डॉ. गोविंद काळे, माधवराव ढवळीकर ट्रस्टचे संचालक मिथील ढवळीकर, संकेत मुळे, वीज खात्याचे अभियंते स्टीफन फर्नांडिस सार्वजनीक बांधकाम खात्याच्या अभियंत्या सौ. बांदेकर, सहाय्यक अभियंते अरविंद फडते, जिल्हा पंचायत सदस्य दामोदर नाईक, बांदोडार्चें उपसरपंच चित्रा फडते, मुक्ता नाईक, वामन नाईक, रामचंद्र नाईक, व्यंकटेश गावडे, राजू नाईक, मडकइं& पंचायतीचे सरपंच शैलेंद्र पणजीकर, कुंडईचे सरपंच सर्वेश कुंडईकर, कवळेच्या सरपंच मनुजा नाईक, तळावलीच्या सरपंच वसुंधरा सावंत तळावलीकर, दुर्भाट आगापूरच्या सरपंचा क्षिप्रा आडपईकर आदी उपस्थीत होते.
शहराकडे धाव घेतलेल्या युवा पिढीला धेंडलो, वसुबारस, श्रीकृष्ण व लक्ष्मी पूजन, भाऊबिज या पारंपारिक सणांचा विसर पडलेला आहे. या सण उत्सवाची पार्श्वभूमी व संकल्पना विषयी ही युवा पिढी अनभिज्ञ आहे. ती त्याना ज्ञात व्हावी म्हणूनच हा प्रामणिक प्रयत्न आहे. कवळेचे माजी सरपंच राजेश कवळेकर यांनी कवळेत होणारी नरकासुर वध स्पर्धा बंद केली होती. ती परत सुरु करण्यापेक्षा असा दीपोत्सव व संस्कृतीमय कार्यक्रम साजरा करणे उचित होते. तीन हजार कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही तुमच्या कार्यक्रमात सहभागी होऊ असे पुढे बोलताना मंत्री ढवळीकर यांनी सांगितले.
नष्ट झालेल्या नरकासुराची स्तुती नको – डॉ गोविंद काळे
करुक्षेत्रावर रणागंणात गलीतगात्र झालेल्या अर्जुनाला युद्ध करण्यास श्रीकृष्ण प्रवृत्त करताना त्याला त्याच्या कर्तव्याची जाणिव करुन देतो. त्याच प्रमाणे मंत्री ढवळीकर यांनी नरकासुराचा वध होऊन नष्ट झालेल्या नरकासुराला पारितोषिके देऊन त्याचा गौरव करण्यापेक्षा ज्या नराकासुराचा श्रीकृष्णाने वध केला त्याची स्तुती स्त्राsते गाऊन त्याचे पूजन करा. ही संस्कृती व कर्तव्य आहे. ते यथायोग्यपणे पार पाडा. मंत्री सुदिन ढवळीकरांनी त्यांच्या कृतीतून बांदोडकर मैदानावर दीपोत्सव कार्यक्रमातून हे दाखवून दिले आहे, असे डॉ. गोविंद काळे म्हणाले.
पणत्यासारखे अलौकीक कार्य करा – सागर जावडेकर
दीपोत्सवात पेटवलेल्या पणत्यांप्रमाणे समाजातील प्रत्येक व्यक्तीने स्वतः अलौकीक कार्य करुन इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याची आवश्यकता आहे. असा संदेश जशा पणती काळोख दूर करुन देते, तसेच मंत्री ढवळीकर यांनी बांदोडकर मैदानावर संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडवून त्याचे सर्वंधन करण्यासाठी युवकांना पुढे येण्यासाठी प्रेरणा दिली आहे. असा दीपोत्सव सर्वत्र होण्यासाठी सर्वांनी सकारात्मक विचाराने कार्यरत राहावे असे सागर जावडेकर म्हणाले.
आपल्या प्रास्ताविक भाषणात मिथील ढवळीकर म्हणाले, मंत्री ढवळीकरांच्या संकल्पनेला वाढता प्रतिसाद पाहून संस्कृतीचे सर्वंधन युवा पिढी निश्चीतच करील.
वीज खात्याच्या अभियंत्याच्याहस्ते दीपप्रज्ज्वलीत करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. सूत्रसंचालन राजू नाईक तर चित्रा फडते यांनी आभार मानले. स्व.
भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर लावलेले आकाश कंदील, पणत्या व विद्युत् रोषणाईमुळे धेंडलोत्सव व वसूबारस कार्यक्रमात रंगत आली. पुरोहित श्री. गोब्र यांच्या अधिपत्याखाली बांदोडा पंचायतीच्या पंचसदस्य सौ. मुक्ता नारायण नाईक यांच्याहस्ते श्रीकृष्ण व लक्ष्मी पुजन करण्यात आले. सामुहीकरित्या भाऊबिज करण्यात आली. त्यानंतर ‘दीप सप्तस्वर’ हा अमोल बावडेकर, अबोली गिर्हे, गणेश मेस्त्री व नम्रता पराडकर यांचा व साथी कलाकारांचा सांगीतिक कार्यक्रम सादर झाला.









