मयुर चराटकर
बांदा
श्री देव बांदेश्वर भूमिका पंचायतनचा प्रतिवार्षिक दीपोत्सव कार्यक्रम बुधवार दिनांक १३ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.सायंकाळी ६ वाजता मान्यवरांच्या हस्ते दीपोत्सवाचे उदघाट्न होणार आहे. दिवे लावण्याची वेळ ही सायंकाळी ६ ते रात्री १० पर्यंत आहे. दिव्यांसाठी लागणाऱ्या कापसाच्या वाती, तेल व पणत्या आदी साहित्य देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती मार्फत देण्यात येणार आहेत.
जास्तीत जास्त भाविकांनी श्री देव बांदेश्वर भुमिका चरणी दिप प्रज्वलित करुन दीपोत्सव सोहऴ्यात सहभागी व्हावे असे आवाहन श्री देव बांदेश्वर स्थानिक सल्लागार उपसमितीच्या वतीने करण्यात आले आहे.









