वार्ताहर /लाटंबार्से
सम्राट क्लब लाटंबार्से जिल्हा पंचायत क्षेत्रातर्फे दीपोत्सव साजरा करण्यात आला. खोलपेवाडी येथील श्री केळेश्वर मंदिरात 300 पणत्या पेटवून मंदिर परिसर तेजोमय करण्यात आला.
छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अध्यक्ष नितीन नाईक यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून व दीपज्योती प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमास सम्राट क्लब लाटंबार्सेचे खजिनदार शिवगरु नानोडकर, शिवाजी मंडळाचे अध्यक्ष रामदास वरक, उपाध्यक्ष विजय सावळ, खजिनदार संतोष झोरे, सचिव मंदार पाटील, सदस्य विनायक तिवरेकर, सचिन कोळेकर, सायली सावळ, आकाश देसाई, सिंथिया सावळ, अर्पिता परब, आचल तिवरेकर, वैभवी सावळ, रिद्धी साळकर, योगिता सावळ, तन्वी पाडलोसकर, पूजा शिंदे, महादेव रेडकर, वैभवी गवस, ऋषभ रेडकर, आरुष जंगले, बाबू पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी सायली, वैभवी, अर्पिता, आचल, विजय, सचिन, सिंधिया व रिद्धी यांनी मंदिराच्या सभागृहात रानमाळावरील फुलांची सुरेख रांगोळी काढून मान्यवरांचे लक्ष आकर्षित करून घेतले. शिवगुरू नानोडकर यांनी आभार मानले.









