बेळगाव :
आचार्य गल्ली, गाडे मार्ग, शहापूर येथील लोकमान्य श्री राम मंदिर ट्रस्टच्यावतीने धार्मिक पद्धतीने दीपोत्सव कार्यक्रम आणि प्रवचन उत्साहात पार पडले.
प्रारंभी मंदिराचे पुरोहित महेश ग्रामोपाध्ये यांनी प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमान मूर्तींचे मंत्रोच्चार पद्धतीने लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचे व्हाईस चेअरमन अजित गरगट्टी, संचालक सुबोध गावडे, संचालक गजानन धामणेकर, समन्वयक विनायक जाधव तसेच मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
दीपोत्सवनिमित्त मंदिरात झेंडूच्या फुलांनी मंदिराच्या गाभाऱ्यात तसेच मंदिर व पटांगणात राजश्री मिरजकर यांनी उत्कृष्ट रांगोळी रेखाटली. परिसरातील महिला नामधारकांनीही दिवे आणून ते पेटविण्यात आले. त्यामुळे मंदिर परिसर दिव्यांनी उजळून गेला होता.
सद्गुरु वामनराव पै प्रणित जीवनविद्या मिशन बेळगाव शाखेचे प्रबोधक शंकरराव बांदकर यांचा लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचे व्हाईस चेअरमन अजित गरगट्टी, संचालक गजानन धामणेकर, संचालक सुबोध गावडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. रांगोळी घालणारे सेवेकरी राजश्री मिरजकर यांचे सुबोध गावडे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
सूत्रसंचालन विनायक जाधव यांनी केले. मधुरा शिरोडकर यांचे संध्या कालकुंद्रीकर यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. तबलावादक वैभव पाटील, गायिका कविता मोदगेकर, सुलभा जाधव, अर्चना जाधव, स्वरा पाटील, गोकुळ अकनोजी, राजेश हांडे, ज्योतिबा तांजी, तानाजी पाटील यांचा सत्कार करण्यात आला. संगीत जीवनविद्येच्या तालावर हरिपाठ घेऊन प्रबोधक शंकरराव बांदकर यांनी दीपोत्सव आणि प्रभू श्रीराम आधारित प्रवचन केले.
अनिल चौधरी, लोकमान्य सोसायटीचे पीआरओ राजू नाईक, मार्केटिंग मॅनेजर गुरु प्रसाद तंगणकर, सुधीर कालकुंद्रीकर आदी उपस्थित होते. मंदिर ट्रस्टच्यावतीने भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले.









