मुंबई
अभिनेत्री दिपीका पदुकोणने मॅटरनिटी ब्रेकनंतर पुन्हा शुटींगच्या सेटवर परतणार आहे. तिच्या चाहत्यासाठी तिच्या वाढदिवसानिमित्त ही गुडन्यूज मिळाली आहे. दिपीकाने तिच्या मुलीच्या म्हणजेच दुआच्या जन्मानंतर कामातून ब्रेक घेतला होता. तिने हा ब्रेक दुआच्या संगोपनासाठी घेतला होता. काही दिवसातच आता ती पुन्हा शुटींग सुरू करणार आहे.

दिपीकाचा सिंघम रिटर्न नुकताच प्रदर्शित झाला. मिडीया रिपोर्टनुसार, दिपीका आता लवकरच कल्की एडी २८९८ पार्ट २ या सिनेमाच्या शुटींगला सुरुवात करणार आहे. या सिनेमाचा पहिला पार्ट १ ने बॉक्स ऑफीसवर चांगला धुमाकूळ गाजवला आहे.









