ज्योतिबा डोंगर,प्रतिनिधी
महाराष्ट्राचे कुलदैवत व आराध्य दैवत दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाचा बुधवार दिनांक 5 रोजीचा चैत्री यात्रेचा धार्मिक सोहळा ,पालखी सोहळा ,सासन काठी सोहळा, व इतर विविध उत्सव व भाविकांच्या सेवा सुविधेसाठी जोतिबा पुजारी ,ग्रामस्थ, पोलीस प्रशासन व शासकीय अधिकारी व देवस्थान समिती या सर्वांना एकत्रित घेऊन दख्खनचा राजा ज्योतिबा देवाचा चैत्र यात्रा सोहळा मोठ्या उत्साहात व मोठ्या दिमाखात पार पडण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन ज्योतिबा देवस्थान समितीचे इन्चार्ज ऑफिसर दीपक मेहतर तरुण भारतशी बोलताना म्हणाले
दख्खनचा राजा श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगर येथे चैत्र यात्रेचा मुख्य दिवस बुधवार दिनांक 5 एप्रिल रोजी आहे या यात्रेनिमित्त सर्व शासकीय विभागाने नियोजन चालू केले आहे ,याबरोबरच ज्योतिबा देवस्थानचे इन्चार्ज ऑफिसर दीपक मेहकर यांनी ज्योतिबा देवस्थान समिती मार्फत विविध भाविकांच्या सेवेसाठी नियोजन व उपाययोजना केल्या आहेत, यासंदर्भात तरुण भारतशी बोलताना त्यांनी नियोजन संदर्भात बातचीत केली ते पुढे म्हणाले श्री .केदारलिंग देवस्थान समितीमार्फत चैत्र यात्रेवर संपूर्ण नियंत्रण राहण्यासाठी व कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी संपूर्ण मंदीर परिसर ,पार्किंग व डोंगर परिसर या ठिकाणी 150 सी.सी.टी.व्ही कॅमेरे लावणेत आले आहेत . गाडी पार्किंग ठिकाणी जे.सी.बी.च्या सहाय्याने जमिनीची लेवल व रस्ता करणेत आला आहे . पार्किंग ठिकाणी संपूर्ण लाईट व्यवस्था .ज्योतिबा मंदिर व श्री . यमाई मंदिराची रंगरंगोटी पूर्ण झाले आहे, भाविकांचे सोईसाठी नविन दर्शन मंडप तयार करुन त्यामधून भाविकांना उन्हाचा अगर पावसाचा त्रास न होता दर्शनाची सोय करणेत आली आहे . यंदाची यात्रा मोठ्या प्रमाणात भरणार असलेने बंदोबस्तासाठी असणारे पोलिस ,होमगार्ड ,स्वयंमसेवक यांचेबरोबर खाजगी सेक्यूरिटी गार्ड यांची जेवण व राहण्याची सोय तसेच भाविकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी दिशा दर्शक फलक, सूचनाफलक , पिण्याची पाण्याची सोय, स्वच्छता, आरोग्याच्या सोयी सुविधा तसेच पार्किंग पासून ज्योतिबापर्यंत मोफत एसटी सेवा, यात्रे दिवशी क्रिनव्दारे श्रींचे लाईव्ह दर्शनाची अनेक ठिकाणी सोय, विज खंडित झालेस मोठ्या जनरेटरची सोय, व महापालिका अग्निशामक दल गाडी, सहजसेवा टस्ट्रमार्फत अन्नछत्र व आर . के . मेहता ट्रस्ट यांचेमार्फत अन्नछत्र सेवा ,या ठिकाणी विविध सोय उपलब्ध करून दिल्या आहेत.
मंदिर आवारामध्ये रोटरी क्लब यांचेवतीने भाविकांना मोफत दवाखाना, प्लाझा येथे व्हाईट आर्मी व जीवन ज्योत आपत्कालीन व्यवस्था यांचेमार्फत मोफत दवाखाना, भाविकांना फिरत्या शौचालय व पाण्याची व्यवस्था, मंदिराच्या सर्व शिखरांची रंगरंगोटी दर्शन रांगेसाठी बॅरॅकेट तर या बरोबरच जोतिबा चैत्र यात्रेस धार्मिक सोहळा, धुपारती सोहळा ,पालखी सोहळा ,महा अभिषेक सोहळा, व विविध सोहळे उत्सव होत असतात अनेक मानपान होत असतात याची तयारी पुजारी वर्ग व देवस्थान समिती करत असते त्यामुळे संपूर्ण पुजारी वर्गाला बरोबरीने घेऊन देवस्थान समिती यांच्या सहकार्याने सर्व सोहळे उत्साहात व मंगलमय वातावरणात करणार आहे. याबरोबरच पोलीस प्रशासन, शासकीय विभाग यांना बरोबरीने घेऊन देवस्थान समिती हा संपूर्ण श्री ज्योतिबा चा चैत्र उत्सव आनंदाने दख्खनचा राजा जोतिबा देवाच्या आशीर्वादाने आम्ही देवस्थान समिती संपन्न करण्याचा प्रयत्न करणार आहे असे प्रतिपादन देवस्थान समितीचे इन्चार्ज ऑफीसर दीपक मेहतर यांनी तरुण भारत शी बोलताना म्हणाले .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









