ऑनलाईन टीम / तरुण भारत :
नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शिक्षक भरती करण्याचा सरकारचा विचार आहे. पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 20 हजार शिक्षकांची भरती केली जाईल, असे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
केसरकर म्हणाले, राज्यातील जवळपास अडीच लाख उमेदवार शिक्षक भरतीच्या प्रतिक्षेत आहेत. राज्य सरकारने भरतीबाबत यापूर्वीच संकेत दिले आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शिक्षक भरती केली जाईल. पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांची भरती होईल. विद्यार्थ्यांचे आधार व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती संदर्भात आकडा कळेल. पण दुसऱ्या टप्प्यात साधारण 20 हजार शिक्षकांची भरती केली जाईल. शंभर टक्के शिक्षक भरती होणार आहे. त्यासाठी संच मान्यता झाली पाहिजे. कारण आरक्षणानुसार ही पद भरती होईल. या उमेदवारांच्या मुलाखती होऊन त्यांची भरती केली जाईल.
शिक्षकांच्या बदलीविषयी ते म्हणाले, शिक्षकांची बदली झाली नाही तर एक जबाबदारीची जाणीव त्या शिक्षकांमध्ये असते. आतापर्यंत शिक्षा म्हणून एखाद्या शिक्षकाची बदली करावी लागायची आता बदली न करता त्या शिक्षकांना ट्रेनिंग द्यावी लागेल, असेही ते म्हणाले.








