वेंगुर्लेतील रामेश्वर देवस्थान परिसर सुशोभिकरण कामाचे शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन
वेंगुर्ले(वार्ताहर)-
वेंगुर्लेचे ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वर मंदिर परीसर तीर्थक्षेत्र माध्यमातून सुशोबिकरण करण्यासाठी स्थानिक आमदार तथा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसकर यांनी शासनाकडून मंजुर घेतलेल्या 50 लाख निधी रकमेच्या कामाचे भुमीपुजन आज सोमवारी श्रीदेव रामेश्वर मंदिरात शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने भुमीपुजन शुभारंभ करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना श्री केसरकर म्हणाले. श्री देव रामेश्वर हि वेंगुर्ले वासियांची ग्रामदेवता आहे. या मंदिरात येणाऱ्या सर्व भाविकांना अभिमान वाटेल असा कायापालट मंदिराच्या सुभोभिकरणातून होईल. रामेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्षा दाजी परब व मानकरी यांनी काम चांगल्या दर्जाचे होण्यासाठी सहकार्य करावे. वेंगुर्ले तालुक्यात व जिल्ह्यात हे मंदिर सुशोभिकणाने सर्वाच्या नजरेत भरेल असा कायापालट होणार असून येत्या ६ महिन्यात आवश्यकतेनुसार आणखीही देणार असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांत रामेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दाजी परब, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, वेंगुर्ले तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, शहर प्रमुख उमेश येरम, जिल्हा संघटक सुनिल डुबळे, सचिन देसाई, सुनिल मोरजकर, नगरपरीषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ, आर्कीटेक्ट अमित कामत, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय आंग्रे, अशोक दळवी, तालुका संघटक बाळा दळवी, दोडामार्गचे तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस, रामेश्वर देवस्थानचे मानकरी सुनिल परब, सुंदर परब, संजय परब, रामदास परब, प्रदीप परब, विनायक परब, प्रताप परब, जयवंत परब, वासुदेव परब, आमा परब, माजी जि.प. सदस्य नितीन शिरोडकर, सेनेचे वेंगुर्ले तालुका ओबीसी तालुका प्रमुख गणपत केळूसकर, प्रकाश मोठे, माजी नगरसेवक सुहास गवंडळकर, बबन नार्वेकर, सौ. वृंदा मोर्डेकर, कौशिक परब, सोमनाथ टोमके आदीसहित शिवसेना पदाधिकरी व नागरीक यांचा मोठ्या संख्येने समावेश होता.









