Deepak Kesarkar on Dasara Melava 2022 : दसरा मेळावा ठाकरेंचा कि शिंदेंचा याचा वाद आता मिटला आहे. बॉम्बे हायकोर्टाने उद्धव ठाकरे यांना शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा घेण्यासाठी एकनाथ शिंदे ठाम आहेत. यासाठी ते आता सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत. याबाबत दीपक केसरकरांनी आज कोल्हापुरात भाष्य केलं. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सोनं लूटणार असल्याचेही म्हटलं आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले, दसरा मेळाव्यासाठी सुप्रीम कोर्टात जाण्याची शिवसैनिकांची इच्छा आहे, पण याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. कोर्टानं दिलेल्या सूचनांचे पालन करण्यात येत नाही. काल निकाल लागल्यानंतर कशा पद्धतीने जल्लोष केला हे सगळ्यांनी पाहिले. कायदा आणि सुव्यवस्था राखावी असं कोर्टाने सांगितले होते. पण काल कसे चिडवण्यात आलं हे पाहिले.आम्ही कुणाला चिडवलं नाही, आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सोनं लूटणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
नवरात्रोत्सवात भाविकांची गैरसोय होणार नाही
नवरात्रोत्सवाला येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही. रिक्षा संघटना बरोबर चर्चा करून मोफत रिक्षा सेवा देण्याबाबत विचार सुरू आहेत. ज्या ठिकाणी शौचालय नाही ते बांधण्यासाठी योग्य तो निधी दिला जाईल. आणि चांगल्या पद्धतीचे शौचालय बांधले जाईल. कोल्हापुरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला कुठं पार्किंग आहे, कुठं थांबायचं आहे, दर्शन रांग कशी आहे याचं माहिती पत्रक दिलं जाईल. देवीच्या मूर्तीवरील वज्रलेपवरून कुणी राजकारण करू नये. शिवसेना ही आमचीच आहे, कट्टर शिवसैनिक याच राजकारण करणार नाहीत मी त्या शिवसैनिकांशी चर्चा करेन असेही ते म्हणाले.
Previous Articleअवैध होर्डिंगचा महापालिकेला कोट्य़वधींचा चुना
Next Article कामात हयगय केल्यास घरी जावे लागेल








