Deepak Kesarkar : कोणाला खोके खोके म्हणता, खोक्याबरोबर खेळायची आदित्य ठाकरेंना लहानपणापासून सवय असेल. आम्हाला खोक्याबरोबर खेळायची सवय नाही. आम्ही जनतेबरोबर राहिलो म्हणून आमदार झालो. जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवला म्हणून आम्ही आमदार झालो. दिल्लीत मोदींना भेटून आल्यानंतर महाराष्ट्रात गेल्याबरोबर मी हे दुरुस्त करेन, असं आश्वासन देऊन तुम्ही इथे आलात. परंतु इथे आल्यानंतर तुम्ही तो शब्द मोडला, तर कोणी कोणाला फसवलं हे महाराष्ट्राच्या जनतेलासुद्धा समजलं पाहिजे, असं मला वाटतं. पंतप्रधानांसमोर दिलेली कबुली उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेसमोर सांगावी असेही दीपक केसरकर आज माध्यमांशी बोलताना म्हणाले.आज ते कोल्हापुरात बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले, तुम्ही आम्हाला जायला सांगितलं. आणि आता उलट सांगत आहात. आम्ही उद्धव ठाकरेंना पुन्हा पुन्हा सांगितलं, आजसुद्धा तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीबरोबरची आघाडी तोडा, आम्ही सर्व जण तुमच्याबरोबर येऊ, असेही आश्वासन केसरकरांनी दिलं. तुम्ही स्वतः पंतप्रधान महोदयांच्या समोर कबूल केलेलं होतं की, काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर जाण्याची तुमच्याकडून चूक झाली, हिंदुत्वाचा विचार सोडण्यात तुमची चूक झालेली आहे, असं म्हणत शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
Previous Articleभाजपकडून विधानसभेच्या २८८, लोकसभेच्या ४८ जागांची तयारी
Next Article केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वर्क फ्रॉम होम बंद








