Deepak Kesarkar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे बारसूमध्ये जाऊन विकासामध्ये अडथळा निर्माण करत आहेत. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन आंदोलकांशी चर्चा केली पाहिजे. त्यांच्या काय मागण्या आहेत या विचारात घेतल्या पाहिजेत. विरोधासाठी विरोध होणार नाही. कोकणातील तरुणांनाही रोजगार मिळाला पाहिजे. कोकणची प्रगती झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 101 व्या स्मृतिदिनानिमित्त नर्सरी बागेतील राजश्री शाहू महाराज स्मृती समाधी स्थळावर तसेच संपूर्ण कोल्हापुरात शंभर सेकंद स्तबधता पाळून शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आले. यावेळी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, संभाजी राजे छत्रपती यांच्यासह पालकमंत्री दीपक केसरकर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांनी रिफायनरी बारसू येथे व्हावे हे पत्र देवून सुचवलं होतं. महाराष्ट्रातील इतिहासात पहिल्यांदाच स्वतः पत्र देऊन स्वतः विरोध करणे होत आहे.म्हणूनच त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल शरद पवारांनी आत्मचरित्रामध्ये व्यवस्थित लिहिलं आहे.पवार साहेब यांनी लिहलयं त्यावर मी अधिक बोलणे गरजेचं नाही.तुम्ही आत्मचरित्र वाचा म्हणजे तुम्हाला त्यांची कार्यपद्धती कळेल.
शरद पवार यांनी लिहिल्याप्रमाणे मुख्यमंत्रीपद हे उद्धव ठाकरे यांनी स्वीकारायला नको होतं.आणि स्वीकारलं आहे तर त्याला न्याय देणं गरजेचं होतं. ते आज सुद्धा पदाला न्याय देऊ शकतात.त्यांनी पत्र लिहल्या प्रमाणे पर्यावरणाची हाणी ना होता मुलांच्या रोजगारासाठी त्यांनी बारसू संदर्भात जे पत्र लिहलं त्यासाठी माजी मुख्यमंत्र्यांनी न्याय देणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








