आज शिवसेनेमध्ये जे घडत आहे, त्यामुळे शिवसैनिक कुठेही हलला नाही. ज्यांनी सत्ता मिळवण्यासाठी बंड केला आहे. त्यांच्याविरोधात सर्व शिवसैनिक एकवटले आहे. राज्यात जे काही सत्ता परिवर्तन झाले आहे. ते लोकांना आवडलेले नाही. त्यामुळे राज्यात आगामी काळात वेगळे चित्र पाहण्यास मिळणार असा टोला राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी शिंदे गटाला लगावला. यावर शरद पवार यांनी स्वप्न पाहू नये असा सल्ला शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesrkar) यांनी दिला.
भाजपाच्या वतीनं राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. यावेळी बोलताना केसरकर म्हणाले, शरद पवार यांनी स्वप्न पाहू नयेत. तसेच आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांची भाषा बोलायची की उद्धव ठाकरे यांची याचा निर्णय लवकर घ्यावा असा सल्लाही देण्यात आला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








