Deepak Kesarkar : महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.सांगलीतून आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या विटा येथील घरी जात असताना तासगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा आळते या मॉडेल स्कूल शाळेस भेट दिली .या शाळेने जिल्हा मॉडेल स्कूल अंतर्गत राबवलेले उपक्रम पाहून शाळेच्या प्रगतीविषयी कौतुक केले.शाळेची पी.पी.टी प्रेझेंटेशन पाहिली.शाळेची सुसज्ज इमारत,भौतिक सुविधा,भव्य क्रीडांगण,बोलक्या भिंती,सायन्स पार्क,बालोद्यान,परसबाग, हॅन्ड वॉश स्टेशन, शाळेतील दोन किलो वॉट सौर उर्जा प्रकल्प व शाळेच्या गुणवत्ता विषयक बाबी याविषयी आढावा घेतला.
आजपर्यंत शाळेने विविध राबवलेले उपक्रम पाहिले.शाळेच्या पहिली ते दहावीच्या अनुदानित वर्गासाठी प्रस्ताव सादर करण्यात यावा.तसेच संगणक कक्षासाठी आवश्यक मागणी करावी असा अभिप्राय दिला.आळते जिल्हा परिषद शाळेने सन २०१९-२०२० मध्ये जिल्हा परिषद सांगलीने आयोजित केलेल्या “स्वच्छ ,सुंदर व आदर्श शाळा’ या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे.आळते गावचे ठाणे स्थित उद्योजक के.आर.कुलकर्णी यांनी सहा खोल्या व बहुउद्देशीय सभागृह बांधून दिले आहे.जिल्हा मॉडेल स्कूल अंतर्गत व लोकसहभागातून या शाळेचा कायापालट झाला आहे.
यावेळी शिक्षण उपसंचालक महेश चोथे,खानापूर-आटपाडी आमदार अनिल भाऊ बाबर , शिक्षणाधिकारी,मोहन गायकवाड ,अविनाश मोहिते,केंद्र प्रमुख रविंद्र खरमाटे, सरपंच आनंदराव माळी,संजय पाटील, मुख्याध्यापक शंकर गुरव ,सर्व शिक्षक उपस्थित होते.