मुंबई
कोटक महिंद्रा बँकेच्या अंतरिम व्यवस्थापकीय संचालकपदी दीपक गुप्ता यांची निवड करण्यात आल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने दिली आहे. रिझर्व्ह बँकेने त्यांच्या निवडीच्या प्रस्तावाला परवानगी दिली असून 2 सप्टेंबर 2023 पासून अंतरिम व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी दोन महिन्यांकरता गुप्ता हे सांभाळणार आहेत. कोटक महिंद्रा बँकेचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक उदय कोटक यांनी नुकताच राजीनामा दिला असून त्यानंतर हे पद रिकामे राहिले होते. अखेर या पदावर रिझर्व्ह बँकेने दीपक गुप्ता यांना पाचारण केले आहे.









