उपाध्यक्षपदी नितीन सावंत
कट्टा / वार्ताहर
पेंडूर सहकारी दुग्ध व्यावसायिक संस्थेच्या नूतन संचालक मंडळांची निवडणूक बिनविरोध झाली. या संचालकांमधून अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड देखील एकमुखाने बिनविरोध करण्यात आली. पेंडूर दुध सोसायटीच्या अध्यक्षपदी दिपक विष्णू गावडे तर उपाध्यक्षपदी नितीन विठ्ठल सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पेंडूर सहकारी दूध संस्था ही गेली काही वर्षे पेंडूर गावातील शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे. या संस्थेकडून महिन्याला हजारो लिटर दूध घेतले जाते व त्याचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना दिला जातो. तसेच बोनस सणासुदीला भेटवस्तू देऊन शेतकऱ्यांचा मेहनतीला प्रोत्साहन दिले जाते. शेतकऱ्यांना नवीन जनावरे गाय, म्हैस घेण्यासाठी बँकेकडून कर्जप्रकरण वेळी सहकार्य केले जाते. यापुढे देखील अशाच प्रकारे सहकार्य केले जाईल असे यावेळी नूतन अध्यक्ष व संचालक मंडळ यांनी सांगितले. नूतन संचालक पुढीलप्रमाणे शिवराम महादेव सावंत, संजय सुभाष नाईक, गजानन वासुदेव सावंत, सुहास दिनकर साटम, राजन कृष्णा पेंडूरकर, विश्राम विठ्ठल राणे, सोनाली शंकर सावंत, सुविधा श्रीकृष्ण राणे यांची निवड करण्यात आली. यावेळी माजी उपाध्यक्ष गजानन प. सावंत, माजी संचालक जयसिंग परब ,कर्मचारी शिल्पा राऊळ,संतोष माळके,पपू नाईक, प्रदीप सावंत ,सुभाष गावडे आदी उपस्थित होते. निवडणूक प्रकियेसाठी निवडणूक अधिकारी म्हणून एस. ए. धवण यांनी काम पाहिले.









