वृत्तसंस्था /नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक फेडरेशनतर्फे डोहा येथे सुरू असलेल्या विश्व चषक अॅपेरेटस या जिम्नॅस्टिक प्रकारात भारताची महिला जिम्नॅस्ट दीपा कर्माकरने महिलांच्या व्हॉल्टमध्ये अंतिम फेरी गाठली आहे. पात्र फेरीमध्ये दीपाने सहावे स्थान मिळवले. सदर स्पर्धा पॅरीस ऑलिम्पिकसाठी पात्र फेरीची म्हणून ओळखली जाते. महिलांच्या व्हॉल्ट प्रकारात दीपाने सहावे स्थान पटकावले. मात्र भारताची महिला जिम्नॅस्ट प्रणातीला ही संधी हुकली. गेल्या महिन्यात अझरबेजान येथे झालेल्या विश्वचषक अॅपेरेटस जिम्नॅस्टिक स्पर्धेत 30 वर्षीय दीपा कर्माकरने पहिल्या व्हॉल्टमध्ये 12.500 तर दुसऱ्या व्हॉल्टमध्ये 12.783 गुण नोंदवले. या क्रीडा प्रकारात नेव्हास केर्लाने 13.916 गुणासह पहिले तर जॉर्जिवा व्हॅलेटिना 13.316 गुणासह दुसरे आणि अॅन ओकेने 13.166 गुणासह तिसरे स्थान मिळवले. गेल्या दीपा कर्माकरवर उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्याबद्दल घालण्यात आलेल्या निर्बंधाचा कालावधी संपुष्टात आला होता. त्यानंतर ती जर्मनीतील विश्वचषक अॅपेरेटस स्पर्धेत सहभागी झाली नव्हती. कैरोमध्ये 15 ते 18 फेब्रुवारीमध्ये झालेल्या विश्वचषक अॅपॅरॅटस स्पर्धेत दीपाला पाचवे स्थान मिळवले होते तर प्रणातीने या स्पर्धेत कास्यपदक मिळवले होते. आता पॅरीस ऑलिम्पिकसाठी पात्र फेरीची आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धा उझ्बेक येथे 16 ते 19 मे दरम्यान होणार असून ही ऑलिम्पिकसाठीची शेवटची पात्रता स्पर्धा राहिल.









