प्रतिनिधी /काणकोण
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या काणकोण शाखेने दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या दीपसजावट आणि गोड पदार्थ स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धांत संजीवनी काणकोणकर, प्रिया देसाई, विभा पागी, दानवी शेणवी नगर्सेकर, प्राजक्ता देसाई यांना पारितोषिके मिळाली. स्पर्धांचे परीक्षण ममता चिमूलकर, अनुपा प्रभू व रूपाली नाईक यांनी केले. शाखा व्यवस्थापक महेंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या स्पर्धांच्या वेळी रमेश कोमरपंत यांनी स्वागत केले आणि त्यांनीच नंतर आभार मानले. संचित प्रभुदेसाई यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली.









