झोपेत मेंदूचे मेमरी हब असते सक्रीय
गाढ झोपेमुळे स्मरणशक्ती मजबूत होते असे बोलले जाते. परंतु हे कसे घडते हे कुणीच जाणत नाही. परंतु संशोधकांनी आता मानवी मेंदूच्या आत फिजियोलॉजिकल एव्हिडेन्स मिळाल्याचे सांगत त्यांच्याद्वारे झोपेदरम्यान मेंदू स्मरणशक्ती कशी बळकट करतो हे स्पष्ट होत असल्याचे म्हटले आहे.
संशोधकांनी मेंदूचे अध्ययन पेले आहे. अध्ययन करण्यासाठी क्लोज-लूप सिस्टीमची मदत घेण्यात आली. मेंदूच्या एका हिस्स्यात डिलिव्हर होणाऱ्या इलेक्ट्रिकल प्लसला दुसऱ्या हिस्स्यात स्टोअर मेमोरीसोबत मर्ज करणारी ही सिस्टीम आहे. ही सिस्टीम अल्झायमर, डिमेंशियाने ग्रस्त रुग्णांसाठी सहाय्यभूत ठरू शकते.
झोपेदरम्यान मेंदू सूचनांना मेमरीत कसे बदलतो यावरून संशोधन झाले आहे. यात झोपेदरम्यान मेंदूचा मेमरी हब म्हणवून घेणारा हिप्पोकॅम्पस अन् तर्क करणारा सेरेब्रल कोर्टेक्स परस्परांमध्ये संपर्क साधतात. हा प्रकार गाढ झोपेदरम्यान घटतो, तेव्हा मेंदूतून निघणारे तरंग अत्यंत मंद असतात. त्यावेळी मेंदूच्या विविध हिस्स्यांचे न्यूरॉन्स परस्परांच्या सूचनांची देवाणघेवाण करतात असे संशोधकांकडून सांगण्यात आले.

या अध्ययनातून पहिल्यांदाच न्यूरॉन्सच्या परस्परांमधील सूचनांच्या देवाणघेवाणीच्या मॅकेनिजमची माहिती मिळाली आहे. मेमरी हब झोपेदरम्यान प्लॅनिंग अन् तर्क करणाऱ्या हिस्स्याद्वारे माहिती मिळवून त्याला स्मरणशक्तीत रुपांतरित करत असल्याचे आढळून आले आहे.
झोपेचे अल्झायमर्सशी थेट कनेक्शन
अर्धवट झोपेचा अल्झायमर्स आजाराशी कनेक्शन असल्याचे यापूर्वीच्या संशोधनात आढळून आले होते. स्मरणशक्ती घटणे, भ्रम वाटू लागणे अणि नव्या गोष्टी समजून घेण्यास वेळ लागणे ही अल्झायमर्सची लक्षणे आहेत. जर तुम्ही योग्य झोप घेत असाल तर अल्झायमर्स होण्याचा धोका कमी असतो असे संशोधकांचे सांगणे आहे.









