नवी दिल्ली / वृत्तसंस्था
घाऊक महागाई निर्देशांकात फेब्रुवारी महिन्यात घट झाल्याचे दिसून आले आहे. सप्टेंबर 2021 पासून फेब्रुवारी 2023 या सलग 18 महिन्यांमध्ये घाऊक महागाई निर्देशांकामध्ये सर्वाधिक घट फेब्रुवारीत झाली आहे. फेब्रुवारीत हा निर्देशांक 3.85 टक्के इतका होता. तर गेल्या वर्षी याच महेन्यात तो 5.18 टक्के इतका होता. ही घट जवळपास 40 टक्के इतकी आहे.
उत्पादित वस्तूंच्या वाढदरात घट झाली आहे. तसेच इंधन आणि वीज यांच्या वाढदरातही जानेवारीच्या 15.15 टक्क्यांवरुन पेंब्रुवारीत 14.8 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. 2022 मध्ये फेब्रुवारीत हा दर 30.8 टक्के इतका जास्त होता. फेब्रुवारीत बटाटय़ाच्या दरात मोठी घट झाली आहे. बटाटय़ाचे दर गेले 11 महिने सातत्याने वाढत होते. फेब्रुवारीत ही वाढ बरीच कमी झाली आहे. गव्हाचे दरही जानेवारीच्या तुलनेत 18.54 टक्के घटले आहेत. ही तीन महिन्यांमधील सर्वाधिक घट आहे. फळांच्या दरवाढीत 7 टक्के, तर दुधाच्या दरव<ाढीत 10.33 टक्के घट झाली आहे. भाजीपाल्याच्या दरात सलग चौथ्या महिन्यात घट दिसून आली आहे.
सुती आणि पॉलिमर धाग्यांच्या दरवाढीत सलग तिसऱया महिन्यात घट झाली असून या घटीचा दर 3.5 टक्के आहे. तथापि, वस्त्रप्रावरणांच्या दर निर्देशांक वाढला आहे. डाळी आणि भरड धान्यांच्या दर निर्देशांकात घट झाली आहे. तांदळाच्या दर निर्देशांकाततील काही प्रमाणात घट झाली आहे.
कांद्याच्या दरातील घट सर्वाधिक म्हणजे 4014 टक्के इतकी आहे. कांद्याचे दर गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने घटत आहेत. कांद्याचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात आल्याने ही घट होत आहे. एकंदर, अन्नधान्ये, डाळी, भाजीपाला, कांदा, बटाटा आणि इतर खाद्यवस्तूंच्या घाऊक दरांमध्यें घट होत आहे.









