नवी दिल्ली
दुचाकी, प्रवासी वाहने आणि तीन चाकी वाहनांची निर्यात गेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये 35 टक्के इतकी कमी राहिल्याची माहिती सियाम या संघटनेने नुकतीच दिली आहे.
भारतातून दुचाकी, प्रवासी वाहने आणि तीन चाकी वाहने जवळपास 3 लाख 1 हजारहून अधिक इतकी फेब्रुवारी महिन्यामध्ये निर्यात करण्यात आली आहेत. मागच्या वर्षी याच महिन्यात 4 लाख 63 हजारहून अधिक एकंदर वाहनांची निर्यात करण्यात आली होती. भारतातून मागच्या महिन्यामध्ये 2 लाख 35 हजार 87 इतक्या दुचाकी वाहनांची निर्यात करण्यात आली आहे. मागच्या वर्षी याच महिन्यात दुचाकीची निर्यात 3 लाख 75 हजार 689 इतकी होती. अमेरिकेतील युएस डॉलर चलनातली घसरण यामुळे निर्यातीमध्ये अडथळे जाणवले. मोटरसायकलची निर्यात 2 लाख अधिक राहिली आहे.









