अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी यांनी चंद्राला हिंदु सनातन राष्ट्र म्हणून घोषित करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे. चंद्रावरील ज्या बिंदूवर चांद्रयान-3 चे लँडींग केले गेले आहे त्या ‘शिवशक्ती’ आणि चांद्रयान-2 जेथे स्थान दिले जाईल असे पंतप्रधानांनी जाहीर केल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ही मागणी करण्यात आली आहे.
आपल्य़ा टि्वटर हँडलवर एक व्हिडियो टाकून त्यामध्ये हिंदु महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी हि मागणी केली आहे. ते म्हणाले, “भारत सरकारने चंद्राला हिंदू सनातन राष्ट्र म्हणून घोषित केले पाहिजे. त्यासंबंधीचा ठराव मोदी सरकाने संसदेत मंजूर करून घेतला पाहीजे.”
आपल्या व्हिडीओत पुढे बोलताना ते म्हणाले, “चंद्रयान- 3 च्या लँडिंगच्या ठिकाणी ‘शिवशक्ती’ या पॉईंटची हिंदुराष्ट्राची राजधानी म्हणून विकास करण्यात यावा. जेणेकरून कोणत्याही दहशतवादी किंवा जिहादी मानसिकतेचा कोणताही दहशतवादी त्या ठिकाणी पोहोचू शकणार नाही. भारत सरकारने कोणतेही दहशतवादी चंद्रावर पोहोचू नयेत म्हणून त्वरीत कारवाई करावी.”असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, चांद्रयान-३ च्या लँडिंग पॉइंटच्या नावावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये राजकीय शब्दयुद्ध सुरू झाले आहे. काँग्रेस नेते रशीद अल्वी म्हणाले की, हे नाव हास्यास्पद आहे. कारण मोदींना चंद्राच्या पृष्ठभागावर नाव देण्याचा कोणताच अधिकार नाही. तर भाजपचे शेहजाद पूनावाला यांनी काँग्रेस केवळ आपला ‘हिंदूविरोधी’ अजेंडा राबवत असल्याचे म्हटले आहे.









