भाजपा शेतकरी मोर्चाच्यावतीने तहसीलदारांना निवेदन : सुरळीत वीजपुरवठा करण्याचीही मागणी
वार्ताहर /नंदगड
गेल्या महिन्याभरापासून पाऊस नसल्याने भातासह अन्य पिके सुकून गेली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे खानापूर तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर करावा, अशी मागणी करणारे निवेदन खानापूर तहसीलदारांमार्फत भाजपच्या शेतकरी मोर्चाच्यावतीने बुधवारी देण्यात आले. तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी निवेदन स्वीकारून वरिष्ठांकडे निवेदन पाठवणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले, काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केला आहे. शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी विद्युतपुरवठा मिळत नाही. भाजप सरकारच्या काळात सात तास पूर्ण काळ विद्युतपुरवठा केला जात होता. परंतु काँग्रेस सरकारने विद्युतपुरवठा तीन तासावर आणून ठेवला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याला आणि खानापूर तालुक्मयातील शेतकऱ्यांना संकटाला तोंड द्यावे लागत आहे. जूनपासून पावसाचे प्रमाण खानापूर तालुक्मयाची खूपच कमी आहे. त्यामुळे तालुक्मयाला दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर करावा. भाजप सरकारने जिल्हास्तरीय गोशाळा स्थापन करण्याचा प्रयत्न केला. पण काँग्रेस सरकारने त्यालाही विशेष महत्त्व दिले नाही. किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्राकडून 6000 आणि राज्य सरकारकडून 4000 ऊपये देण्यात येत होते. आता केवळ केंद्र सरकारकडून सहा हजार ऊपये देण्यात येत आहेत. गृहलक्ष्मी योजनेतील अनेक महिलांच्या नावे रक्कम नसल्याने असंतोषाचे वातावरण आहे. यावेळी माजी आमदार अरविंद पाटील, भाजपाचे तालुका अध्यक्ष संजय कुबल, रयत मोर्चाचे प्रकाश तिरवीर आदीनी विचार मांडले. यावेळी मनोहर कदम, सदानंद होसूरकर, विजय कामत, बाबुराव देसाई, गुंडू तोपिनकट्टी, सदानंद पाटील, शेतकरी व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.









