भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून थकीत वेतन देण्याच्या
प्रतिनिधी/कोल्हापूर
शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सक्षम आहेत. त्यांनी भूविकास बँकेच्या शेतकऱयांचे कर्ज माफ करून आणि कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन व इतर देणी देण्याची घोषणा करून त्यांनी आपण संवेदशील आणि सक्षम मुख्यमंत्री असल्याचे स्पष्ट केले आहे, असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले.
भूविकास बँकेच्या थकीत वेतन व इतर देणी देण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केल्यानंतर या कर्मचाऱ्यांच्या वतीने विजयराव पाटील, सांगावचे नंदकुमार पाटील, हणमंतवाडीचे भारत पाटील, श्रीकांत भैय्या कदम आदींनी क्षीरसागर यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. तसेच शिंदे सरकारचे आभारही मानले. यावेळी पद्माकर कापसे यांच्यासह भूविकास बँकेचे शेतकरी सभासद आणि कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी क्षीरसागर यांनी आपण आमदार असताना विधानसभेत भूविकास बँकेच्या कर्जदार शेतकरी आणि कर्मचाऱयांच्या व्यथा, वेदना, अडचणी मांडल्या होत्या. त्यानंतर शासकीय पातळीवरही पाठपुरावा सुरू ठेवला होता. दिवाळीत मुख्यमंत्री शिंदे यांनी 964 कोटींची कर्जमाफी जाहीर केली. यामध्ये कोल्हापूर जिह्यातील भूविकास बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांना सुमारे 41 कोटींची कर्जमाफी मिळणार आहे. तर कर्मचाऱ्यांना सुमारे 12 कोटी 41 लाखांचे थकीत वेतन अदा करण्यात येणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा हा निर्णय शेतकरी, कर्मऱयांच्या दृष्टीने मोलाचा आहे, असे सांगितले.









