प्रतिनिधी/ बेंगळूर
म्हैसूर शहरविकास प्राधिकरणात (मुडा) झालेल्या घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश पी. एन. देसाई यांच्या नेतृत्त्वाखाली एक सदस्यीय आयोग स्थापन करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. निवृत्त न्यायाधीश पी. एन. देसाई यांच्या नेतृत्त्वाखालील आयोग म्हैसूरच्या मुडामधील घोटाळ्याची चौकशी करणार आहे. मुडा घोटाळा विधिमंडळाच्या अधिवेशनात गाजण्यापूर्वीच सरकारने न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. या एक सदस्यीय आयोगाने मुडा घोटाळ्याबाबत सहा महिन्यात अहवाल सादर करावे, असे आदेशात म्हटले आहे.









