वृत्तसंस्था/नवी दिल्ली
दिल्ली मद्य धोरणाशी संबंधित सीबीआय प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामिनावर सर्वोच्च न्यायालय शुक्रवार, 13 सप्टेंबर रोजी निकाल देणार आहे. 5 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांच्या जामीन याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता. केजरीवाल यांना जामीन मिळाल्यास ते तुऊंगातून बाहेर येऊ शकतात. मद्य धोरणाशी संबंधित ईडी प्रकरणात त्यांना 12 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयातून जामीन मिळाला होता. ईडीने 21 मार्च रोजी केजरीवाल यांना अटक केली होती. मद्य धोरण प्रकरणात भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सीबीआयने 26 जून रोजी केजरीवाल यांना अटक केली होती. जामिनावर बाहेर पडण्यासाठी त्यांच्याकडून न्यायालयीन युक्तिवाद सुरू असले तरी तपास यंत्रणांकडून होणाऱ्या विरोधामुळे अरविंद केजरीवाल सध्या तिहार कारागृहात बंदिस्त आहेत.









