निजदचा आरोप : सर्व योजना लागू करण्याची मागणी
बेळगाव : काँग्रेस पक्षाने निवडणुकीच्या वेळेला मतदारांना आमिषे दाखविली आहेत. महिला बस प्रवास मोफत, 10 किलो तांदूळ, वीज बिल, कुटुंबातील मुख्य महिलेला 2 हजार, शिक्षित बेरोजगारांना मानधन दिले जाईल, असे सांगितले आहे. मात्र आता या योजना लागू करताना टाळाटाळ केली जात आहे. मुख्यता अनेक गावांना बसच नाही. ती प्रथम सुरू करावी यासह इतर मागण्यांसाठी निधर्मी जनता दलातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवडणुकीच्यावेळी अनेक आश्वासने दिली आहेत. सध्या काही गावांना बसच नाही. रस्त्यावर ख•s पडले आहेत. त्यामुळे बस जाणे अवघड बनले आहे. याचबरोबर इतर योजनांसाठी वेगवेगळ्या जाचक अटी लादण्यात येत आहेत. त्यामुळे सरकारने जनतेची फसवणूक केल्याचा आरोप निवेदनात केला आहे. वीजबिल दरात भरमसाट वाढ केली आहे. 200 युनिट मोफत देण्याचे जाहीर केले. मात्र त्यालाही अटी लादल्या आहेत. ही बाब अत्यंत गंभीर आहे. काँग्रेसने जनतेची फसवणूक केली आहे. असा आरोप करण्यात आला. अप्पर जिल्हाधिकारी के. टी. शांताला यांना निवेदन देण्यात आले. यावेळी निजदचे जिल्हाध्यक्ष शंकर माडलगी, राष्ट्र उपाध्यक्ष प्रताप पाटील, फैजुल्ला माडीवाले, नासीर बागवान, मारुती अष्टगी, प्रमोद पाटील, उमा पाटील, शशिकला पडगीसह कार्यकर्ते उपस्थित होते.









