Death threat to Sharad Pawar राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीने पवारांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी फोन करून देशी कट्ट्याने ठार मारू अशी धमकी दिली. सिल्व्हर ओकवरील पोलीस ऑपरेटरने याबाबत गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर अज्ञाताविरोधात 294 आणि 506 (2) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी या फोनची गंभीर दखल घेत कॉल करणाऱ्याचे लोकेशन ट्रेस केले. त्यानंतर तो व्यक्ती बिहारचा असल्याचे समोर आले. त्याची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. यापूर्वीही याच व्यक्तीने पवारांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. हा व्यक्ती वेडा असल्याचा दावा पवार यांच्या कार्यालयाकडून करण्यात आला आहे.
अधिक वाचा : पुण्यात आज कडकडीत बंद, डेक्कन परिसरातून मूक मोर्चाला सुरूवात