ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोमवारी रात्री डायल 112 वर हा धमकीचा फोन आला होता. तपासादरम्यान, हा फोन पुण्यातील वारजे परिसरातून आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी कॉलरला अटक केली.
सोमवारी रात्री आरोपीने डायल 112 वर फोन केला. मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे, एवढं बोलून त्याने फोन कट केला होता. डायल 112 चं कंट्रोल रुम नागपूरमध्ये आहे, तिथेच हा फोन आला होता. या फोननंतर पोलीस सतर्क झाले. त्यांनी पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे हालवत फोनचं लोकेशन टेस केलं. त्यावेळी हा फोन पुण्याच्या वारजे परिसरातून आल्याचे समोर आले. त्यानंतर लोकेशन ट्रेस करत पोलिसांचे एक पथक वारजे परिसरात पोहचले. तिथून या कॉलरला अटक करण्यात आली.
कॉलर हा दारूच्या नशेत होता. पहिल्यांदा त्याने ॲम्ब्युलन्ससाठी फोन होता. पण ॲम्ब्युलन्स आली नाही म्हणून त्याने डायल 112 कॉल करुन थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवून टाकण्याची धमकी दिल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले.
अधिक वाचा : यंदा मान्सून कमी








