कसबा बीड /प्रतिनिधी
Kolhapur Accident News : कोगे तालुका करवीर येथील सुवर्णा राजाराम चव्हाण (वय-62) यांचा मुलासोबत घरी जात असताना कोगे कमानीजवळ चाकात पदर अडकल्याने अपघात होऊन त्या जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी सी.पी. आर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र बुधवारी पहाटेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार मयत सुवर्णा चव्हाण ह्या दही-दूध विक्री करून उदरनिर्वाह करत होत्या. मुले लहान असतानाच पतीचे निधन झाले.त्यामुळे घरची सर्व जबाबदारी त्यांच्यावर होती.रविवारी नेहमीप्रमाणे दही-दूध विक्री करून घरी येत असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला.दुचाकीच्या चाकात पदर अडकल्याने त्या गाडीवरून पडल्या. यात त्याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली. त्यांना नातेवाईकांनी खाजगी रुग्णालयात दाखल केले होते.त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना सी.पी.आर रुग्णालयात दाखल केल. मात्र उपचार दरम्यान त्याचे निधन झाले.त्याच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी,सूना व नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने कोगे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.









