Death of severely burnt young woman from Sonurli Pakyachiwadi
पेटता दिवा कपड्याला लागून गंभीररीत्या भाजलेल्या त्या युवतीचे उपचारा दरम्यान निधन झाले. ही घटना ३१ डिसेंबरला घडली लीला कमळाजी नाईक २९ रा. सोनुर्ली पाक्याचीवाडी असे तिचे नाव आहे. संबधित युवती २२ डिसेंबरला न्हाणी घरात पेटता दिवा घेऊन जात असताना तो कपड्याला लागल्याने गंभीरित्या भाजली होती. यावेळी तिच्यावर सावंतवाडी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले होते तर त्यानंतर गोवा बांबुळी येथे तिच्यावर उपचार सुरु असताना तिची प्राणज्योत मालवली. याबाबत आज सावंतवाडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संबधित युवती न्हाणी घरात पेटता दिवा घेऊन जात असताना तिच्या कपड्यांनी पेट घेतल्यामुळे ती गंभीरित्या भाजली होती. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिला सावंतवाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्याठिकाणी प्राथमिक उपचार करुन अधिक उपचारासाठी तिला तात्काळ गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले होते. त्याठिकाणी उपचारादरम्यान ३१ डिसेंबरला तिचे निधन झाले. तर आज सावंतवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
न्हावेली / वार्ताहर









