प्रतिनिधी / बेळगाव
शेख ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे चेअरमन व कार्यकारी विश्वस्त डॉ. अबू ए. शेख (वय 89) यांचे दि. 22 रोजी निधन झाले. नुरानी मशीद स्मशानभूमीमध्ये गुरुवारी सकाळी 11 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. आयएएस अधिकारी डॉ. एम. ए. शेख यांचे सुपुत्र असलेले डॉ. अबू शेख यांनी 1993 मध्ये शेख ग्रुपची सुत्रे हातात घेतली. शेख संस्थेच्या प्रगतीसाठी ते अविरत झटले आणि या संस्थेमध्ये दर्जात्मक शिक्षण मिळेल, यासाठी त्यांनी प्रयत्न केले.









