शाहूवाडी, प्रतिनिधी
पुसार्ळे पैकी धनगर वाडा येथील कुमारी नथाबाई बाबू कोळापटे (वय-16) या युवतीचा विहिरीत पाय घसरून मृत्यू झाल्याची नोंद शाहूवाडी पोलिसात झाली आहे.
पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार कुमारी नथाबाई बाबू कोळापटे ही बुधवारी सकाळी कपडे धुण्यासाठी विहिरीवर गेली होती.या दरम्यान तिचा पाय घसरून ती पाण्यात पडली यातच तिचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.मलकापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
तरुण मुलगीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कोळापटे कुटुंबियांना चांगलाच धक्का बसला आहे.तिच्या पश्चात आई-वडील ,भाऊ ,बहीण असा परिवार आहे .









