रत्नागिरी प्रतिनिधी
तालुक्यातील कुरतडे कातळवाडी येथे विषारी द्रव्य पाशन करणाऱ्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल़ा ही घटना गुरूवारी सकाळी 9 च्या सुमारास घडल़ी विकास सखाराम फुटक (40, ऱा कुरतडे कातळवाडी) असे मृताचे नाव आह़े या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली आह़े.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विकास फुटक यांनी 1 मार्च 2023 रोजी गवत मारण्याचे विष पाशन केल़े यावेळी त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी रत्नागिरीतील खासगी रूग्णालयात दाखल केले होत़े 2 मार्च रोजी सकाळी 9 च्या सुमारास विकास यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल़ा याप्रकरणी ग्रामीण पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आह़े.









