रत्नागिरी प्रतिनिधी
शहरालगतच्या नाचणे सुपलवाडी येथे स्वतच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल़ा साक्षी संजय कुवेस्कर (35, ऱा नाचणे सुपलवाडी) असे मृत महिलेचे नाव आह़े साक्षी हिच्यावर गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर येथे उपचार करण्यात येत होत़े उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद शहर पोलिसांत करण्यात आली आह़े.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्षी ही मागील काही वर्षापासून अस्थमाच्या आजाराने त्रस्त होत़ी याच आजारपणाला कंटाळून साक्षी हिने घरात रिक्षासाठी आणलेले पेट्रोल अंगावर ओतून पेटवून घेतल़े यामध्ये साक्षी या गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रूग्णालयात दाखल करण्यात आले होत़े उपचार सुरू असतानाच साक्षी यांचा मृत्यू झाल़ा या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यातील हवालदार जाधव पुढील तपास करत आहेत़.









