प्रतिनिधी / धारबांदोडा
पेटके-धारबांदोडा येथील एका फार्ममध्ये फासाला अडकलेल्या बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना काल गुरूवारी सायंकाळी उघडकीसआली. सदर बिबट्या मादी असल्याचे स्पष्ट झाले असून जखमी अवस्थेत तो आढळून आला होता.
कुळे क्षेत्रीय विभागाचे वनधिकारी रवी शिरोडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पेटके-धारबांदोडा येथील एका फार्ममध्ये बिबट्या फासाला अडकला होता. याची माहिती त्या फार्मच्या मालकाने वनविभागाला सायंकाळी पावणेपाचवाजता दिली. त्यानंतर वनविभागाने घटनास्थळी भेट देऊन पाहणीकेली व बेंडला येथून रेस्क्यू टीमला पाचारण केले मात्र तोपर्यंत बिबट्याचा मृत्यू झाला होता. आज सकाळी पशुवैद्यकीय डॉक्टराच्या टिम कडून बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे व चौकशीसाठी सदर फार्म मालकाला बोलावण्यात येणार असल्याचे सांगितले.









