फासकी लावणाऱ्या बागमजूरास अटक
कणकवली : वार्ताहर
वन्य प्राण्याची शिकार करण्याच्या उद्देशाने लावलेल्या फासकीमध्ये अडकून बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना साळीस्ते – रामेश्वरनगर येथे सोमवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. हा प्रकार साळीस्ते येथील विलास वरे यांच्या मालकीच्या आंबा बागेमध्ये घडला. याबाबत फासकी लावणारा, बागेतील मजूर अनिल आत्माराम कणेरे (रा. साळीस्ते) याला वनविभागाने गुन्हा दाखल करून अटक केली. तर मृत बिबट्याचे जानवली येथील वनविभाग कार्यालय परिसरात विच्छेदन करून तेथेच दहनही करण्यात आले.









