इस्लामपूर, प्रतिनिधी
Leopard Sangli News : वाळवा तालुक्यातील कार्वे येथे विहिरीत बुडून ६ महिन्याच्या एका नर जातीच्या बिबट्याचा मृत्यू झाला आहे. बिबट्याचे श्वविच्छेदन करण्यात आल्याची माहिती शिराळा विभागाचे वनक्षेत्रपाल सचिन जाधव यांनी दिली.
कार्वे येथील हणमंत महादेव माळी यांच्या शेतातील विहिरीत अंदाजे सहा महिने वयाचा बिबट्या पडला. विहिरीतील पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याचे वनविभागाने स्पष्ट केले.या घटनेच्या पहाणी सहाय्यक वनसंरक्षक, सांगलीचे डॉ. अजित साजणे व जाधव यांनी केली.
हेही वाचा- शिराळा तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतीसाठी १३०२ कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना
त्यानंतर इस्लामपूर येथील दत्त टेकडी परिसरातील कार्यालयात या सहा महिन्याच्या बिबट्याचे शवविच्छेदन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.अंबादास माडकर यांनी केले. यामध्ये पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.यावेळी शिराळ्याचे वनक्षेत्रपाल सचिन जाधव,वनरक्षक अजित पाटील यांच्यासह बावची व भवानीनगर येथील वनक्षेत्रपाल उपस्थित होते.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








