दुसऱया महायुद्धात कोटय़वधी लोकांचा मृत्यू झाला होता. लाखोंच्या संख्येने सैनिकही प्राणांस मुकले होते. या युद्धात मरण पावलेल्या एका सैनिकाचे घर त्याच्या मृत्यूनंतर 80 वर्षांनी उघडण्यात आले आहे. हा सैनिक एकटाच असल्याने आणि त्याला जवळचे नातेवाईक नसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त लवकर उघड झालेले नव्हते. अनेक वर्षे तो बेपत्ता असल्याचेच वाटत होते.
तथापि, नंतर त्याचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. पण याचे कोणीही नातेवाईक त्याच्यासाठी पुढे आले नाहीत. या सैनिकाचे घर नेमके कोठे होते, तेही लवकर माहीत झाले नाही. अखेर त्याच्या मृत्यूनंतर 80 वर्षांनी त्याच्या छोटय़ा घराचा शोध लागला. तो पर्यंत ते घर बंदच होते. एका शहरी कार्यकर्त्याने हे घर उघडण्याचे धाडस दाखविले. ते उघडल्यानंतर त्याला आत जे दिसले ते त्याच्या कल्पनेबाहेरचे होते. त्याच्या घरात अश्लील मजकूर असणाऱया पुस्तकांचा आणि नियतकालिकांचा खजिनाच सापडला. तसेच घराच्या आवारात अनेक ट्रक्सचे सांगाडे दिसून आले. घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त अवस्थेत होते. अनेक सूट आणि कोट भिंतींवर टांगले होते. घरात कचरा भरला होता. घरात चालता येणेही कठीण होते. इतके दिवस घर बंद कसे राहिले, यासंबंधी आश्चर्य वाटत आहे.









