Ratnagiri : रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे लावगणवाडी येथील बौद्धवाडीच्या स्मशानाजवळील आंब्याच्या बागेत गावातीलच दिलीप रामाणे (६०) यांचा मृतदेह चेहरा विद्रूप केल्याच्या अवस्थेत आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे कोतवडे गावासह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी शुक्रवारी रात्री लावगणवाडी येथे मोठी गर्दी केली होती. चेहरा विद्रूप केलेला असल्याने दिलीप रामाणे यांची हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक संशय वाढला आहे.
रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे ग्रामपंचायत हद्दीतील लागणवाडी येथे राहणारे दिलीप रामाणे हे गावातच मोलमजुरीचे काम करतात. शुक्रवारी ग्रामपंचायत हद्दीतील लागणवाडी येथे राहणारे दिलीप रामाणे हे गावातच मोलमजुरीचे काम करतात. शुक्रवारी दिवसभर त्यांना गावातील ग्रामस्थांनी पाहिले होते, परंतु शुक्रवारी रात्री ९.३० वाजता काही तरुण लावगणवाडी येथील रस्त्यावरून जात असताना बागेत त्यांना एक व्यक्ती रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली असल्याचे दिसून आली. परंतु त्यांचा चेहरा विद्रूप झालेला असल्याने घातपताचा संशय बळावला. स्थानिक ग्रामस्थांनी गावच्या पोलीस पाटलांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस पाटलांनी तात्काळ या घटनेची माहिती ग्रामीण पोलीस स्थानकाला दिली. याबाबतचा अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









