Deaapak Kesarkar : मंत्रिमंडळाचा विस्तार दोन दिवसांपूर्वी करण्यात आला असून,आज संध्याकाळपर्यंत खाते वाटप होऊ शकते. जी खाती आम्हाला दिली जातील त्याचा पदभर आम्ही स्विकारणार आहोत. हा पदभार स्वीकारण्यापूर्वी आम्ही बाळासाहेबांचे दर्शन घेणार आहोत. त्यांच्याच प्रेरणेनं महाराष्ट्राचा विकास कारायचा आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते मंत्री दीपक केसरकर यांनी खाते वाटप कधी होणार याबाबत भाष्य केलं आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले, बाळासाहेबांचे विचार आम्हाला कायम प्रेरणा देत राहतील.बाळासाहेबांना जे जे अपेक्षित होते महाराष्ट्रातील जनतेसाठी ते ते करून दाखवण्यासाठी आम्ही सर्व जण प्रयत्न करू. ज्यावेळी शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला त्यावेळी आम्ही सर्वच्या सर्व 5 आमदार भर पावसात बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर दर्शनासाठी आलो होतो अशी आठवण त्यांनी यावेळी करून दिली.
शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर शिंदे गाटातील 9 जणांना कॅबिनेट पद देण्यात आले आहे. विस्तारानंतर काल पहिल्यांदाच कॅबिनेटची विस्तारित मंत्रिमंडळ बैठक पार पडली. त्यानंतर मंत्रालयात जाण्यापूर्वी आज शिंदे गटातील शपथ घेतलेल्या सर्व मंत्र्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या शिवाजी पार्कवरील (Shivaji Park) स्मृतिस्थळाला भेट देऊन अभिवादन केलं.
Previous Articleमहानगरपालिकेकडून घरोघरी तिरंगा
Next Article हिडकल जलाशयात 45 टीएमसी पाणीसाठा








