३० ऑगस्ट रोजी म्हैसूर येथे राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी “गृहलक्ष्मी” योजनेचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री डिके शिवकुमार यांच्या उपस्थितीत आज पूर्व तयारीची बैठक पार पडली.
म्हैसूर जिल्हा पंचायत सभागृहात आयोजित या बठकीत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत संवाद साधण्यात आला.

या बैठकीला महिला व बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, म्हैसूर जिल्हापालक मंत्री एच.सी. महादेवाप्पा, चामराजनगर जिल्हापालक मंत्री के. वेंकटेश, मंड्या जिल्हापालक मंत्री चलुवराय स्वामी, आमदार तन्वीर सेठ, नरेंद्र स्वामी, अनिल चिक्कमादु, डी. रवी शंकर, हरीशगौडा, दर्शन ध्रुव नारायण तसेच महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.









