भिलवडीतील महावितरण कार्यालयाचा गलथान कारभार : संदिप राजोबा
भिलवडी वार्ताहर
भिलवडी येथील महावीतरण शाखेचा पुन्हा एखदा गलथान कारथारसमोर आला आहे .सन२०१९मधील महापूरात निकामी झालेली मिटर अद्याप शेतकरयांना बदलून मिळालेली नाहीत . वीज मीटर निकामी झाल्याने आवाच्या सव्वा वीजबील वाढऊन येत असल्याने शेतकरयांच्या खिश्याला चाट बसत आहे . सत्तेत आलेले सरकार यांनी शेतकरयांना पुरेशी वीज ही शेतीसाठी देऊ असे अभिवचन दिले होते .परंतु पुरेशी वीज सोडा तर शेतीसाठी मिळणारी वीज ही लोडशेडींगच्या नावाखाली आठ – आठ तास घालवली जाते . वारंवार वीज खंडीत करुन शेतकरयांना अपुरा पाणीपुरवठा दिला जातो . रात्रीच्या वेळी शेतकरी वर्ग शेतात पाणी पाजण्यासाठी गेल्यास अनेक अपघात घडून काही शेतकरयांचा मृत्यु ही झाला आहे . आशी अनेक उदाहारणे आहेत . यामुळे शेतकरयांना दिली जाणारी वीज ही दिवसा मिळाली पाहीजे अन्यथा या गलथान कारभात सुधारणा जर नाही झाल्यास ४ सप्टेंबर रोजी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे पदाधीकारी व कार्यकर्त्यासह सर्व पक्षीय नेते व कार्यकर्ते रस्त्यावर उतरूण रास्ता रोको करून आंदोलन छेडू असा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते संदिप राजोबा यांनी भिलवडी येथे सर्वपक्षीय बैठकीत दिला.
यावेळी कृष्णाकाठावरील शेतकरी मोठया संख्येने उपस्थीत होते .तर कॉंग्रेसचे माजी जि.प. सदस्य संग्राम दादा पाटील . माजी उपसरपंच चंद्रकांत पाटील . भाजपाचे माजी सरपंच विजय चोपडे . व्यापारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रमेश पाटील . तंटामुक्ती अध्यक्ष बाबासो मोहीते . माजी तंटामुक्ती अध्यक्ष विलास पाटील. चॅलेंजर्स दिपक पाटील. माजी ग्रा.पं. सदस्य सचिन पाटील .आर.पी.आयचे अमरजित कांबळे . कपील शेटे .आदी सर्व पक्षीय नेते व कार्यकार्ते उपस्थीत होते.
भिलवडी महावीतरणच्या कारभारा बाबत कृष्णाकाठावर्ती उलट सुलट चर्चांना उधान आले आहे . घरगुती वीजबील थकीत असल्यास त्या ग्राहकाला वीजबील भरा आशी सूचना आगोदर देणे उचित आसताना . घरात कोणी नसलेले पाहुन वीजबील तोडले जाते . यामुळे अनेक कुटुंबे अंधारातच आपला प्रपंचा चालवित आहेत . पुर्व कल्पना न देताच हि केलेली कारवाई कितपत योग्य आहे ? असा सवाल पडतो आहे . शेतकरयांच्या वाढीव वीज बीला बाबत अनेक शेतकरी महावितरणाच्या ऑफीसच्या पायऱ्या झिझवीत आहेत .परंतु त्यांचे मीटर अद्याप दुरुस्थ होत नाही . केवळ भरमसाठ अंदाजे वाढीव वीज बीले येत आहेत . यामुळे शेतकरयांना वाढीव वीजबील भरण्यापलीकडे पर्याय नाही . महावीतरण भिलवडी शाखा ही दिवसभर आधिकारी व कर्मचारी वीना मोकळीच पडलेली असते अनेक वीज ग्राहक व शेतकरी मोकळे पडलेले ऑफीस पाहुन आल्या पावले निघुन ताज आहेत . यामुळे या ऑफीसला वाली कोण ? असाही प्रश्न सर्वसामान्यांना पडतो आहे .








