रत्नागिरी प्रतिनिधी
रत्नागिरीतील कार्तिकी एकादशीच्या जत्रेत संशयास्पदरित्या फिरणाऱ्या दोघांना न्यायालयाने 7 दिवस सक्तमजुरीची शिक्षा सुनावल़ी कैलास राहूल खाडे (23) व अमोल विजय दगडे (19, ऱा दोन्ही पिंपरी पुणे) अशी आरोपींची नावे आहेत़. रत्नागिरी पथमवर्ग न्यायदंडाधिकारी माणिकराव सावत यांनी या खटल्याचा निकाल दिल़ा.
गुह्यातील माहितीनुसार, संशयित आरोपी हे 4 नोव्हेंबर 2022 रोजी रात्रीच्या सुमारास शहरातील जत्रेत संशयास्पदरित्या फिरत आल्याचे पोलिसांना आढळून आल़े. त्यांच्याकडे पोलिसांकडून चौकशी करण्यात आली असता समाधानकारक उत्तरे देवू शकले नाह़ी शहर पोलिसांकडून दोन्ही संशयितांविरूद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 क नुसार गुन्हा दाखल केल़ा. या पकरणी शहर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार दीपराज पाटील व पवीण वीर यांनी गुह्याचा तपास करून न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठेवल़े या पकरणी न्यायालयाने दोघांनाही दोषी मानून 7 दिवस सक्तमजुरीची शिक्षा सुनावल़ी









