आधी कॅब थांबवली, नंतर बॅग हिसकावली : व्हिडिओ व्हायरल
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
दिल्लीतील प्रगती मैदान बोगद्यात दरोड्याची घटना समोर आली आहे. दोन मोटारसायकलवरून आलेल्या चार चोरट्यांनी बंदुकीच्या धाकावर कारमधून प्रवास करणाऱ्या व्यावसायिकाकडून दोन लाख ऊपये लुटले. आता या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यात दुचाकीस्वार दरोडा टाकताना दिसत आहेत. शनिवारी सायंकाळी तीन ते चार वाजेच्या सुमारास एक व्यापारी रिंगरोडवरून प्रगती मैदान बोगद्यामार्गे इंडिया गेटकडे जात होते. तेव्हाच दोन दुचाकींवरून आलेल्या चार चोरट्यांनी त्यांच्या ‘कॅब’समोर मोटारसायकल थांबवत बंदुकीच्या धाकावर पैशांनी भरलेली बॅग हिसकावून घेतली. या घटनेची तक्रार व्यावसायिकाने टिळक मार्ग पोलीस ठाण्यात नोंदवली असून सध्या पोलीस सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन चोरट्यांचा शोध घेत आहेत. गुजरातमधील मेहसाणा येथील रहिवासी असलेल्या साजन कुमार यांचा दिल्लीतील चांदणी चौकात सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा व्यवसाय आहे. गुऊग्रामस्थित एका फर्मला 2 लाख ऊपये देण्यासाठी ते शनिवारी दुपारी पॅबने जात होते. त्यांच्यासोबत सहकारी जितेंद्र पटेल होते. लाल किल्ल्यावरून पॅब बुक करून ते रिंगरोडने जात असताना प्रगती मैदान बोगद्यात प्रवेश करून ते इंडिया गेटच्या दिशेने निघाले होते. याचदरम्यान दोन दुचाकींवरून आलेल्या चौघांनी त्यांची पॅब बोगद्याच्या आत थांबवली. यानंतर पिस्तूल दाखवून कारची खिडकी उघडली. त्यानंतर पैशांनी भरलेली बॅग घेऊन चोरटे आपापल्या दुचाकीवरून पसार झालेले सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. दिवसाढवळ्या चोरट्यांनी पैशांनी भरलेली बॅग कशी लुटली हे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चोरट्यांचा शोध सुरू आहे. दिवसाढवळ्या या घटनेने दिल्ली पोलीस आणि कायदा आणि सुव्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
नायब राज्यपालांवर केजरीवालांचे टीकास्त्र
राजधानीत दिवसाढवळ्या झालेल्या दरोड्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांच्यावर निशाणा साधत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. कथित घटनेचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत केजरीवाल यांनी दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी स्थानिक सरकारकडे सोपवली जावी या मागणीचा पुनऊच्चार केला. तसेच दिल्लीतील जनतेला सुरक्षा देऊ शकेल अशा व्यक्तीला उपराज्यपाल केले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.









