कोल्हापूर प्रतिनिधी
बुधवारी दि 27 रोजी मंगळवार पेठ येथे भरदिवसा चोरी करण्यात आली आहे. मुकुंद कुलकर्णी म्हसवेकर यांच्या घरातून काही रक्कम आणि ऐवज असलेली पर्स एका महिलेने लंपास केली.
दरम्यान भरदिवसा चोरी करणारी महिला घराच्या सीसीटीव्ही मध्ये मध्ये कैद झाली आहे. कुलकर्णी यांच्या घरी चोरी करून महिला त्याच भागातील दुसऱ्या घरात पर्स टाकून पळून गेली आहे. हे दृश्य देखील काळकाई गल्ली येथील कॅमेरामध्ये दिसत आहे. या घटनेची पोलिसांत तक्रार दाखल केलेली असून पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा शोध घेत आहेत.









