जत :
जत शहरातील विठ्ठलनगर (आदाटे वस्ती) परिसरात भरदिवसा घरफोडीची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत कपाटातील सुमारे अडीच लाखांची रोख रक्कम आणि सव्वा तोळे सोने लंपास केल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, जालिंदर दादासाहेब गणाचारी हे विठ्ठलनगर (जत-निगडी रोड) येथे कुटुंबासह राहतात. त्यांचे घरापासून अंदाजे दीड ते दोन किलोमीटर अंतरावर शेत आहे. मंगळवारी सकाळी कुटुंबातील सर्व सदस्य शेतामध्ये कामासाठी गेले होते. यावेळी अज्ञात चोरट्याने संधी साधत घराचे दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश केला.
गणचारी यांच्या घरातील कपाट उघडून चोरट्याने अडीच लाख रुपये रोख व अंदाजे सव्वा तोळ्याचे सोने चोरून नेले. चोरीची माहिती मिळताच गणाचारी यांनी तत्काळ जत पोलीस ठाण्यात कळवले. पोलीसांनी घटनास्थळी तातडीने भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी दुसऱ्या दिवशी उशिरा पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली असून पुढील तपास जत पोलीस करत आहेत.








