वार्ताहर /जुने गोवे
चोडण येथील दयानंद हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी ’ नशा मुक्त भारत भारत अभियान ’ चा प्रचार व अंमली पदार्थ विरोधी जागृती निर्माण करण्यासाठी चोडण येथील मुख्य रस्त्यावरून पद यात्रा काढली. इयत्ता सहावी व इयत्ता आठवी च्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी या पदयात्रेत भाग घेतला.
अंमली पदार्थ व दारु विरोधात नागरीकांमध्ये जागृती निर्माण करणे तसेच नशा मुक्त भारत अभियानाचा संदेश नागरिकांमध्ये पोहोचविणे हा पद यात्रेचा मुख्य हेतू होता. हातात घोषणांचे फलक घेतलेलें विध्यार्थी ” नशा भगावो,देश बचावो”, नशे को छोडो,अपने घर को बचावो”,” सोरो आसा जींवाक माल,करता आमचे हाल”,” नशा पासून रहा दूर, जीवन सुख मिळवा भरपूर अशा घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या.
रोहन नाईक, स्वप्नलि रायकर,अनंत चोपडेकर,सौ. गौरी महाले, या शिक्षकांनी तसेच बी. एड. प्रशिक्षणार्थी शिक्षीका प्राजक्ता गांवकर व श्रुती उसकयीकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.









