वृत्तसंस्था / लंडन
डेव्हीस चषक फायनल-8 स्पर्धा पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी इटलीमध्ये होणार असल्याची घोषणा आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने केली आहे. आता 2025 ते 2027 या कालावधीत डेव्हीस चषक फायनल-8 इटलीमध्ये होणार आहे.
जेनिक सिनेरच्या नेतृत्वाखाली इटलीने गेल्या दोन डेव्हीस चषक स्पर्धा जिंकली होती. गेल्या महिन्यात मालेगा येथे झालेल्या बिली जिन किंग चषक महिलांची टेनिस स्पर्धा इटलीने जिंकली होती. 2024 च्या टेनिस हंगामाअखेर इटलीच्या जेनिक सिनेरने एटीपीच्या मानांकनात अग्रस्थान राखले आहे. तर महिलांच्या मानांकनात वर्षअखेरीस इटलीची पाओलिनी चौथ्या स्थानावर आहे.









